‘इंटीग्रेटेड सॅाफ्टवेअर’विषयी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत दिली महत्वाची माहिती

Mdahuri Misal : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पाला गतिमान करण्यासाठी महापालिका आणि स्मार्ट सिटी यांच्यासाठी एकत्रित काम करणारी इंटीग्रेटेड सॅाफ्टवेअर ही नवी संगणक प्रणाली विकसित करणे आवश्यक होते. या विषयी आमदार गोरखे यांनी विधानपरिषेदत लक्षवेधी प्रश्न केला. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
आमदार गोरखे यांनी महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्रणालीसाठी ११२ कोटी रुपयांची स्वतंत्र निविदा का काढली असा प्रश्न उपस्थित केला. तसेच काम संथ गतीने होत असल्याचे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले. त्यांनी केलेल्या प्रश्नावर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या प्रणालीचे मे काम २०२५ मध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती विधानपरिषदेत दिली. स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार ५० टक्के आणि राज्य सरकार व महापालिका प्रत्येकी २५ टक्के हिस्सा देत आहे. असे देखील त्यांनी सांगितले.
हेही वाचा – पुण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण पोलिसांकडेच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती
काम संथ गतीने होत असल्याने ९२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. अशा परिस्थितीत कंपनीकडे असलेला डेटा किती सुरक्षित आहे? असा प्रश्न आमदार गोरखे यांनी उपस्थित केला. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर संगणक प्रणालीचे काम २०१९ मध्ये अटॉस इंडियाला देण्यात आले आहे. स्मार्ट सिटी आणि महापालिकेचे सर्व विभाग एकत्र आणण्यासाठी ही प्रणाली विकसित केली जात आहे. पूर्वी महापालिकेच्या सर्व विभागाचे काम स्वतंत्रपणे चालत होते. आता सर्व विभाग एकत्रित येतील. पूर्वीच्या प्रणालीत जीआय तंत्रज्ञान नव्हते. नवीनमध्ये ते तंत्रज्ञान असल्याचे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले.