Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘महाविकास आघाडीकडून मेट्रोचे राजकारण’; राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा विरोधकांवर निशाणा

पुणे :  पाऊस आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने पंतप्रधान मोदींचा नियोजित पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून त्याचे राजकारण केले जात असून. पुणे मेट्रोला विरोध करणारे आता मेट्रोचे प्रतीकात्मक उद्घाटन करत आहेत, अशी टीका करत केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

शहरात पाऊस असल्याने कार्यक्रम रद्द केला. कार्यक्रम झाला असता, तर वाहतूक प्रश्न वाढला असता, नागरिकांना त्रास झाला असता. नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी म्हणून कार्यक्रम रद्द केला असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा   –    ‘शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एमएसपी वाढवण्याचा प्रस्ताव : उपमुख्यमंत्री अजित पवार

मेट्रोचे जाळे वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. राजकारण कशाच करावं, हे विरोधकांना कळत नाही. त्यांच्या काळात विरोधकांनी काय केलं? असा प्रश्न उपस्थित करत पुणेकरांना सगळ समजतं, असेही मोहोळ म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते (दि. २९) रोजी ऑनलाइन पद्धतीने मेट्रोचे उद्घाटन व विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार आहेत. गणेश कला क्रीडा मैदान येथे हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती मोहोळ यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button