सुप्रिया सुळेंच्या हस्ते श्री महालक्ष्मी मंदिरात महाआरती

पुणे : पुणे शहरातील श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे आयोजित ‘नवरात्र उत्सव २०२४’ दरम्यान दुसऱ्या माळेला खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी आणि श्री महाकाली यांची यांची महाआरती संपन्न झाली. या पावन प्रसंगी मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या,“श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग, पुणे इथे नवरात्रीदरम्यान आरतीसाठी मी दरवर्षी येते. श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी आणि श्री महाकाली एकाच ठिकाणी असणारे मंदिर कुठेच नाही; पण पुण्यात आहे.
हेही वाचा – ‘अभिजात भाषेचा दर्जा हा ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाषेचा सन्मान’; राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन
प्रत्येकाने या सुंदर मंदिरात जरूर यावे. मनाला आनंद, समाधान, शांती आणि एक नवी ऊर्जा मिळवण्यासाठी मी नेहमी या मंदिरात येते. इथे येऊन आदिशक्तीच्या आशीर्वादाने नव्या उत्साहासह पुन्हा कामाला लागते.” असं ते यावेळी म्हणाल्या.





