Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

रिंगरोडच्या धर्तीवर पुरंदर विमानतळाचे भूसंपादन

पुणे :  पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाची अधिसूचना महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे पुरंदर विमानतळ हे पूर्वी निश्चित झालेल्या म्हणजेच वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव याच ठिकाणी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान, आता अधिसूचना प्रसिद्धीनंतर भूसंपादनाची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून केली जाणार आहे. पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन करताना रिंगरोड, समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मागील पाच वर्षांत पुरंदर विमानतळाच्या फक्त चर्चाच सुरू होत्या. प्रत्यक्षात मात्र कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. पूर्वी निश्चित केलेल्या या सात गावांच्याऐवजी दुसरीच जागा ठरविण्यात आली होती. पहिल्यांदा निश्चित केलेल्या या जागेसाठी बहुतेक सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. मात्र, दोनपैकी कोणत्या जागेवर विमानतळ उभारायचे, याचा निर्णय राज्य शासनाच्या हाती होता.

आता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्राधान्याने पुरंदर विमानतळाचा मुद्दा हाती घेण्यात आला असून, त्यानुसार या सात गावांतील जागा विमानतळासाठी निश्चित केली आहे. या जागेला केंद्र आणि राज्य सरकार, तसेच एअरपोर्ट ॲथॉरिटी, संरक्षण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. आता एमआयडीसीकडून भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

हेही वाचा –  पेपर तपासणीत होतोय हलगर्जीपणा; विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

सुरुवातीला पुरंदर विमानतळासंदर्भात या सात गावांतील भूसंपादनाची अधिसूचना महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास कंपनीकडून प्रसिद्ध केली होती. आता हा प्रकल्प एमआयडीसीकडे सोपविण्यात आला आहे.

या विमानतळासाठी या सात गावांपैकी सर्वाधिक क्षेत्र हे पारगावमधील संपादित होणार आहे. या गावातील 1 हजार 542 सर्व्हे नंबरमधील 972.679 हेक्टर जागा संपादित होणार आहे. त्या खालोखाल खानवडी गावातील 381 सर्व्हेनंबरमधील 451.880 हेक्टर जागा, कुंभारवळणमधील 424 सर्व्हेनंबर बाधित होत असून, या गावातील 341.690 हेक्टर क्षेत्राचे संपादन होणार आहे. वनपुरी गावातील 362 सर्व्हेनंबर बाधित होत असून, त्यातील 330.890 हेक्टर जमीन, उदाचीवाडीमधील 199 सर्व्हेनंबरमधील 240.470 हेक्टर जमीन, एखतपूरमधील 145 सर्व्हेनंबर बाधित होत असून, त्यातील 214.330 हेक्टर आणि मुंजवडीमधील 221 सर्व्हेनंबरमधील 122.043 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.

विमानतळासाठी पुरंदरमधील सात गावांमधील 2673 हेक्टर जागाही निश्चित करण्यात आली आहे. विमानतळ आर्थिकदृष्ट्या विकसित करण्यासाठी विमानतळासोबतच बहुउद्देशीय माल वाहतूक व साठवणूक केंद्र (मल्टिमोडल लॉजिस्टिक हब) प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे नागरी उड्डाणांसोबतच आयात -निर्यातीला चालना आणि लाखो रोजगार निर्माण होणार आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button