Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोथरूड बनले पुन्हा सत्ताकेंद्र; चंद्रकांत पाटलांच्या रूपाने दुसर्‍यांदा कॅबिनेट मंत्रिपद

पुणे : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने कोथरूड मतदारसंघाला दुसर्‍यांना पुन्हा कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडील कॅबिनेट मंत्रिपदासह खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडील केंद्रीय राज्यमंत्रिपद, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी अशी महत्त्वाची पदे या मतदारसंघात असल्याने कोथरूड पुण्याचे सत्ताकेंद्र बनले आहे.

विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील हे तब्बल 1 लाख 11 हजारांच्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. मात्र, महायुतीत चंद्रकांत पाटील यांना विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार अशी चर्चा होती. त्यानंतर भाजप मंत्रिमंडळात तरुण आणि नव्या चेहर्‍यांना संधी देणार अशीही चर्चा सुरू झाल्याने चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळणार का याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र, पक्षात थेट केंद्रीय नेतृत्वापर्यंत दबदबा असल्याने चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद मिळाले.

हेही वाचा     –        ‘हो, मी नाराज आहे’; मंत्रिपद नाकारल्यानंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया 

मुंबईत पदवीचे शिक्षण घेतलेले चंद्रकांत पाटील हे मुळचे कोल्हापूरचे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेविक संघात त्यांनी अनेक वर्षे काम केले. 2008 ला पदवीधर मतदारसंघातून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. 2014 ला देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात चंद्रकांत पाटील यांनी महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग, मदत अशी महत्त्वाची खाती सांभाळली.

2019 ला पक्षाने त्यांना कोथरूडमधून विधानसभेची उमेदवारी दिली. या ठिकाणी ते विजयी झाले. महायुतीच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी होती. आता पुन्हा त्यांच्याकडे कोणती जबाबदारी येणार याबाबत उत्सुकता आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button