आंतरराष्ट्रीय विमानतळाचा हिवाळी हंगाम उद्यापासून

पुणे : लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा हिवाळी हंगाम दि. २७ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. त्यामध्ये पुण्यातून एका आंतरराष्ट्रीय विमानसेवेबरोबरच काही देशांतर्गत शहरांसाठी सेवा सुरू होणार आहेत. त्यामुळे पुण्यातून विमानांच्या उड्डाणांची संख्या वाढणार आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिवसाला साधारण १९० पेक्षा जास्त विमानांची ये-जा होते. त्यामधून साधारण ३० ते ३२ हजार जण प्रवास करत आहेत. उन्हाळी हंगामध्ये पुणे विमानतळावरून दोन वेळेला एकाच दिवसामध्ये १०० उड्डाणे झाली होती. तर, १०० विमाने पुण्यात आली. रविवार ते सोमवार दरम्यान पुणे विमानतळाला विमानासाठीचे स्लॉट’जास्त असतात. तर, शनिवारी स्लॉट कमी असतात.
हेही वाचा – शरद पवारांना फोडाफोडीचं नोबल दिलं पाहिजे; उदयनराजे भोसलेंचा टोला
त्यामुळे शनिवारी पुण्यातून सुटणारी विमाने कमी असतात. पुणे हे लष्कराचे विमानतळ असल्यामुळे सकाळी नऊ ते साडेअकरा दरम्यान ते बंद असते. त्यामुळे दिवसा स्लॉटची संख्या कमी असते. तर रात्री प्रवासी वाहतुकीसाठी स्लॉट जास्त असतात. त्यामुळे पुण्यातून सुटणारी आणि येणाऱ्या विमानांची संख्या रात्री जास्त असते. पुणे हे देशातील ३५ शहारांसोबत आता थेट जोडले जाणार आहे.या हंगामाध्ये बँकॉकला नवीन विमानसेवा सुरू आहेत. तर, नव्याने भोपाळ, त्रिवेंद्रम या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू होत आहे. तसेच चेन्नई, इंदूर, अहमदाबाद, डेहराडून या शहरांसाठी अतिरिक्त उड्डाणे सुरू झाली आहे.
पुणे विमानतळ देशांतर्गत ३५ शहरे विमानाने थेट जोडली गेली आहेत. हिवाळी हंगामामध्ये एअर इंडिया एक्स्प्रेस चेन्नई, कोचीसाठी थेट उड्डाण सुरू करत आहे. तर, पुण्यातून सिंगापूर, दुबई आणि बँकॉक अशा तीन शहरांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू आहे. त्यामुळे हिवाळी हंगामामध्ये पुण्यातून उड्डाणांची संख्या वाढणार आहे.





