दुर्मिळ आजाराच्या रुग्ण संख्येत वाढ; पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/pune-12-2-780x470.jpg)
पुणे : गुइलेन बॅरी सिंड्रोम या दुर्मिळ आजाराने पुणेकरांना धडकी भरवली आहे. गेल्या काही दिवसांत या आजाराच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहेत. आतापर्यंत ७३ संशयित रुग्णांना या आजाराचा संसर्ग झाला असून १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. या रुग्णांमध्ये ४७ पुरुष तर २६ महिलांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात या आजाराचे सर्वाधिक म्हणजेच ४४ रुग्ण आहेत. ९ वर्षापर्यंत असलेले १३ रुग्ण तर ६० ते ६९ वयोगटातील १५ रुग्ण आहेत. या आजाराची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात पुण्यात बैठक घेत आजाराबाबतची माहिती घेतली. अजित पवार यांनी सर्किट हाऊस येथे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या आजाराचा प्रादुर्भाव सिंहगड रोड परिसरात वाढत असल्याने या भागातील स्थानिक नागरिकांकडून याबाबतची माहिती त्यांनी घेतली आहे.
हेही वाचा : उद्योगमंत्री दावोसला गुंतवणुकीसाठी गेले की लोकं फोडायला? शरद पवारांचा पलटवार
या आजाराचा संसर्ग झालेल्या ७३ रुग्णांच्या लघवी आणि रक्ताचे नमुने (सॅम्पल) राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठण्यात आले होते. या नमून्यांची तपासाणी केल्यानंतर तपासणी अहवालात कॅम्पायलो बँक्टर जेजुनी हा जीवाणू तर नोरो व्हायरस हा विषाणू असल्याचे निषन्न झाले आहे. या जीवाणू आणि विषाणूमुळे रुग्णांना जीबीएसचा संसर्ग झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच या अहवालात दूषित अन्न व पाण्यातून हे जीवाणू आणि विषाणू पसरले जात असून त्यामुळे जीबीएसीची लागण होत असल्याचे समोर आले आहे.
या आजाराने बाधिक होणाऱ्या रुग्णांची संख्या सिंहगड रोड परिसरात अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. परिणामी या भागात या आजाराचा प्रादर्भाव वाढताना दिसत आहे. या आजाराची गांभीर्याने दखल पुणे महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने घेतले असून बाधित ठिकाणी सर्वेक्षण करण्यात येत आहे. या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर महापालिकेच्या वतीने मोफत उपचार करण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त डॅा. राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहर परिसरामध्ये दूषित पाण्यामुळे जीबीएस आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असून, या रुग्णांवर महापालिकेच्या वतीने मोफत उपचार करावे. हा आजार ज्या जीवाणू आणि विषाणूमुळे होत असल्याची माहिती तपासणीत उघड झाली आहे. तसेच दूषित पाण्यामुळे हा आजार होण्याचे कारण मानले जाते. यामुळे दूषित पाण्याचा मृळस्त्रोत ओळखण्यासाठी जल तपासणी मोहिम हाती घ्यावी. अॅडमिट असलेल्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात याव्यात. औषधोउपचाराची तातडीने व्यवस्था करावी. पर्यावरण संसरण कायद्यातंर्गत आवश्यक पावले उचलावीत, या मागण्या करण्यात आल्या आहेत.