पदवीपूर्व दंतवैद्यक क्षेत्रात मॅग्निफिकेशन तंत्रज्ञानाचा समावेश
बियॉन्ड व्हिजन अंतर्गत रंगूनवाला कॉलेजतर्फे मॅग्निफिकेशन मास्टरक्लासचे आयोजन

पुणे | बियॉन्ड व्हिजन अंतर्गत पुण्यातील एम. ए. रंगूनवाला दंतचिकित्सा विज्ञान आणि संशोधन केंद्र यांच्या पुढाकाराने 200 दंतवैद्यक पदवीपूर्व विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण असे मॅग्निफिकेशन हे प्रगत तंत्रज्ञान प्रशिक्षण देण्यात आले. जागतिक एंडोडॉन्टिक्स दिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम भारतीय एंडोडॉन्टिक सोसायटी च्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमामुळे दंत वैद्यकिय शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकले गेल्याची भावना भारतीय एंडोडॉन्टिक सोसायटीचे विभाग प्रमुख डॉ. विवेक हेगडे यांनी व्यक्त केली.
डॉ. हेगडे हे गेली अनेक वर्षांपासून भारतीय एंडोडॉन्टिक सोसायटीच्या माध्यमातून सुक्ष्म दर्शक आधारित मॅग्निफिकेशन मास्टर क्लास घेत आहेत. ज्यामुळे देशभरातील नवोदित दंतचिकित्सकांना प्रेरणा मिळत आहे. दरम्यान मॅग्निफिकेशन मास्टर क्लासमध्ये २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी प्रात्यक्षिकातून मॅग्निफिकेशन तंत्रज्ञानामुळे निदानात अचूकता दश्यमानता व एर्गोनॉमिक्समध्ये सुधारणा करता येते हे शिकता आले.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडकरांसाठी भाजपा महायुती सरकारचे ‘‘दिवाळी गिफ्ट’’
तसेच आधुनिक दंतचिकित्सेमध्ये मॅग्निफिकेशनचा विकास व महत्त्व या विषयावर विस्तृत व्याख्याने अभ्यासता आली. दरम्यान या कार्यक्रमासाठी सहकार्य लूप्सचे प्रायोजक अॅडमेटेक हाईटेक मेडिकल सोल्यूशन यांनी केले. ही संस्था जागतिक स्तरावर नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी ओळखली जाते. दरम्यान एस. सी. ई. सोसायटी च्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार यांनी बियॉन्ड व्हिजनच्या यशाबद्दल कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. डॉ. परवेज इनामदार यांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाचे कौतुक केले. प्राचार्य डॉ. रमणदीप दुग्गल यांनी समाधान व्यक्त करत विभागातील सर्वांचे कौतुक केले.
यावेळी झालेल्या भाषणात डॉ. विवेक हेगडे यांनी या मॅग्निफिकेशन प्रशिक्षण हे तंत्रज्ञान दंतचिकित्सा क्षेत्राचे भविष्य असून पदवीपूर्व दंतवैद्यक विद्यार्थ्यांना नवी संधी आहे. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच या प्रशिक्षणामुळे व्यवसायिक कार्यक्षमता सुधारण्यास वाव असल्याचे त्यांनी सांगितले. सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात आयोजकांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.




