Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पीएमपीएमएलच्या पर्यटन बससेवेमध्ये कोरेगांव भिमा विजयस्तंभाचा समावेश

पुणे :  पीएमपीएमएलकडून सुरू केलेल्या पर्यटन बससेवेमध्ये आता कोरेगांव भिमा विजयस्तंभाचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटन बस क्रमांक ६ मध्ये वाडेबोल्हाई मंदिर, तुळापूर, रांजणगांव गणपती मंदिर यासह आता कोरेगांव भिमा विजय रणस्तंभ याचाही समावेश करण्यात आल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी विविध कार्यालये, कॉलेज, शाळा, औद्योगिक क्षेत्रातील व आयटी क्षेत्रातील कंपन्यांमधील नोकरदारांना साप्ताहिक सुट्टी असते.

त्यामुळे एक दिवस शहर आणि आसपासच्या परिसरात फिरण्यासाठी जाणाऱ्यांची गर्दी असते. हीच बाब लक्षात घेऊन पीएमपीएमएलकडून पर्यटन बससेवेला सुरवात केली.

हेही वाचा    –      नवरात्रीच्या नवव्या माळेला करा कन्या पूजन; जाणून घ्या शुभ मुहूर्त..

प्रवाशांचा प्रवास आरामदायी, सुलभ आणि माफक दरात व्हावा, यासाठी शहर आणि जिल्ह्यातील धार्मिक आणि पर्यटन स्थळांकरिता वातानुकूलीत ई-बसेसव्दारे विशेष पर्यटन बससेवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्टी आणि इतर दिवशी प्रवाशांच्या मागणीनुसार दिली जाते. आतपर्यंत एकूण आठ पर्यटन बससेवा सुरू आहे.

त्यामध्ये पर्यटन बससेवा क्रमांक सहा ही सकाळी ९ वाजता बस पुणे स्टेशन येथून निघते. तेथून पहिला थांबा हा वाघेश्वर मंदिर (वाघोली), त्यानंतर वाडेबोल्हाई मंदिर, तुळापूर त्रिवेणी संगम,छत्रपती संभाजी महाराज समाधी (वढू बुद्रुक), रांजणगांव गणपती मंदिर, कोरेगांव भिमा विजय रणस्तंभ असा पर्यटनस्थळांना भेटी देऊन रात्री पुणे स्टेशन बसस्थानकात येतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button