Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

..तर मला डोनाल्ड ट्रम्पही चालतील; राज ठाकरे काय म्हणाले?

Raj Thackeray | मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या बदलत्या राजकीय भूमिकांवर स्पष्ट आणि परखड भूमिका मांडली आहे. शिवसेना (ठाकरे) यांच्यासोबत युती केल्याच्या निर्णयावर होत असलेल्या टीकांना उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, माझा उद्देश स्वच्छ आहे. महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी माणसाचं अस्तित्व टिकवणं हेच माझं अंतिम ध्येय आहे.

राज ठाकरेंना त्यांच्या सततच्या बदलत्या भूमिकांविषयी विचारण्यात आलं. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले, मला तिथे पाणी पोहोचवायचं आहे. त्याकरता मी कोणत्याही मार्गाने जाईन. माझा उद्देश स्वच्छ आहे. भूमिका बदलण्याबद्दल कोणत्याही राजकीय पक्षाने बोलू नये, भाजपाने, राष्ट्रवादीने तर बोलूच नये. काँग्रेस आणि एमयआएमचे नगरसेवक चालतात आणि माझ्या बदलेलेल्या भूमिका दिसतात?

हेही वाचा      :          चिखली प्रभाग 1 मध्ये आमदार गोपिचंद पडळकरांच्या सभेने ‘‘वारं फिरलं’’ 

महाराष्ट्राचं अस्तित्व टिकवण्याकरता उद्या डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की मी हे टीकवून देतो, तर मला डोनाल्ड ट्रम्पही चालतील. पण टिकणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र,मराठी भाषा आणि मराठी माणूस हा कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठा आहे. तसंच, कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या प्रमाणात या आघाडीला पाठिंबा देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मराठी माणसाच्या हितासाठी मी बरोबर आलो आहे. माझ्या हातात सत्ता कधीच नव्हती. मला सत्ता का हवी आहे हे मी वारंवार सांगत राहणार. त्या उण्याधुण्यांपेक्षा मराठी माणसांचं अस्तित्व टिकवणं गरजेचं आहे. निवडणुका लढवायला पैसे लागतात, पक्ष चालवायला पैसे लागतात. पण म्हणून राज्य ओरबाडायची गरज नाही. निवडणुका अनेक पाहिल्या. परंतु ज्याप्रकारे पैसे वाटप होतात, ते पैसे येतात कुठून? पैसे काँग्रेसवालेही वाटत होते, असंही राज ठाकरे म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button