मकरसंक्रातीला पतंग उडवताना नायलॅान मांजाचा वापर कराल तर…..; पुणे पोलिसांचा थेट इशारा, अन्यथा कारवाई

पुणेः काही दिवसांवर मकरसंक्राताचा सण आला आहे. या सणादिवशी मुलं पतंग उडत असतात, पण पंतग उडताना जर कोणी नायलॅान मांजाचा वापर केला तर मुलांवर नाही तर त्याच्या आई वडिलांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात येणार असल्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. मकरसंक्रात जशी जवळ येऊ लागली आहे तशी नायलॅान मांजीच्या दुकानांवर विक्री वाढू लागली आहे. या मांजावर बंदी असतानाही छुप्प्या पद्धतीने त्याची विक्री केली जात आहे.
अवैध्यरित्या मांजाची विक्री करणाऱ्यांवर पुणे पोलिसांकडून दंडात्मक कारवाई सुरूच आहे. स्थानिक पोलीस आणि महापालिका यांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी छापेमारीत करण्यात आली असून १५ दिवसांत लाखो रुपयांचा नायलॅान मांजा जप्त करण्यात आला आहे. असे असताना छुप्प्या पद्धतीने या मांजाची विक्री सर्रास केली जात आहे. गेल्या काही दिवसांत नायलॅान मांजामुळे अनेकांना गंभीर स्वरुपाची इचा झाली असून काहींना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.
हेही वाचा – ‘देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात टाकण्याचं कारस्थान करणाऱ्यांना..’; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला
यामुळे या प्रकरणी पुणे पोलीस अॅक्शन मोडवर असून मंकरसंक्रातीच्या दिवशी अल्पवयीन मुलं जर नायलॅान मांजाचा वापर करून पतंग उडवताना आढळून आली, तर त्यांच्या आई वडिलांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांना हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मंकरसंक्रात दिवशी आपली अल्पवयीन मुलं नायलॅान मांजाच्या साह्याने तर पतंग उडत तर नाही ना, याच्यावर पालकांना लक्ष ठेवावे लागणार आहे. अन्यथा तसे कोणी पतंग उडवताना पोलिसांना आढळून आल्यास त्याच्या आई वडिलांवर तरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते.




