‘सत्य आणि न्याय जिंकले’, दोषमुक्त झाल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात न्यायालयाने मंत्री छगन भुजबळ यांना दोषमुक्त केले. या निर्णयाबाबत छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया देताना म्हटले, “सत्याचा आणि न्यायाचा विजय झाला आहे.”
भुजबळ यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून न्यायप्रक्रियेवर पूर्ण विश्वास ठेवून संयमाने वाट पाहिली. या काळात त्यांच्या कुटुंबाने, सहकाऱ्यांनी आणि जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल ते कृतज्ञ आहेत. त्यांनी पुढे म्हटले की, यापुढील काळातही अधिक जोमाने जनतेच्या सेवेसाठी काम करत राहणार आहेत.
हेही वाचा –“दीड कोटी महिलांच्या आयुष्यात पहिल्यांदाच पैसा आला”, लाडकी बहीण योजनेवरून चंद्रकांत पाटलांचं विधान
कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाने भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांसाठी मोठा दिलासा दिला असून, या आनंददायी निर्णयामुळे राजकीय वातावरणातही हलचल निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणात न्यायालयाने भुजबळ यांना दोषमुक्त ठरवले आहे.




