मानव-बिबट संघर्षाला आळा घालण्यासाठी एसओपी जाहीर
नसबंदीसाठी राज्य सरकारचा हिरवा झेंडा!
पुणे : मानव-बिबट वाढत्या संघर्षामुळे बिबट्यांची नसबंदी करण्यास मान्यता मिळाली आहे. त्याबाबत अधिक संघर्ष असलेल्या भागांत वनविभागाकडून प्रायोगिक तत्त्वावर बिबट्यांची नसबंदी करण्यात येणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये यासाठी आदर्श कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात येणार आहे. पुण्यासह अहिल्यानगर, नाशिक भागात ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यापासून बिबट्यांचे मानवी वस्तीवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.
हेही वाचा – भारत-अमेरिकेत शस्त्रांसंबंधी मोठा करार ; ९३ दशलक्ष डॉलर्सच्या लष्करी पॅकेजला मंजुरी
पुण्यातील जुन्नर, आंबेगाव आणि शिरूरमध्ये हे प्रमाण अधिक आहे. काही दिवसांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हल्ले कमी होत नसल्याने नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रादेखील घेतला. सरकारने हा विषय गांभीर्याने घेत, उपाययोजनांसाठी बैठकांचे सत्र सुरू केले. बिबट्यांच्या नसबंदीची मागणी नागरिकांमधून सुरू होती. वनमंत्री गणेश नाईक यांनी पुण्यात सोमवारी मादी बिबट्यांच्या निर्बीजीकरणास मान्यता मिळाल्याचे जाहीर केले, तर मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नर बिबट्यांची नसबंदी करण्यावर शिक्कामोर्तब केले. पुण्यात दोन पुनर्वसन केंद्रे करण्यासाठी जागा शोधून आराखडे तयार करण्याचे बैठकीत ठरले आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
वन विभागाकडूनच बिबट्यांची नसबंदी केली जाणार आहे. त्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये ‘एसओपी’ तयार केली जाणार आहे. ती झाल्यानंतर काम सुरू होणार आहे.
– आशिष ठाकरे, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), पुणे वन विभाग
बिबट्यांचे निर्बीजीकरण किंवा नसबंदी करण्याबाबत आम्हाला सरकारकडून सूचना अद्याप आलेल्या नाहीत. विभागातील काही अधिकारी वन विभागात कार्यरत आहेत. डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याचे काम पशुसंवर्धन विभाग करू शकतो. मात्र, प्रत्यक्षात सरकारच्या पुढील सूचना आल्यानंतरच निर्णय होईल.
– डॉ. प्रवीणकुमार देवरे, पशुसंवर्धन आयुक्त




