ताज्या घडामोडीमुंबई

‘उत्तर’ — जीवनातील प्रश्नांना भिडणारा प्रेरणादायी मराठी लघुपट युट्यूबवर

हर्षल आल्पे दिग्दर्शित आणि कल्याणी प्रॉडक्शन निर्मित लघुपटात अभिषेक वीरकर व धनश्री कुलकर्णी यांचा प्रभावी अभिनय

मुंबई : Kalyani Production प्रस्तुत आणि लेखक-दिग्दर्शक हर्षल आल्पे यांच्या दिग्दर्शनातून साकारलेला प्रेरणादायी मराठी लघुपट ‘उत्तर’ आता युट्यूबवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आयुष्याच्या कठीण प्रश्नांना सामोरे जाताना खरा आनंद कसा मिळवावा, याचा सकारात्मक संदेश हा लघुपट देतो.

अभिषेक वीरकर आणि धनश्री कुलकर्णी यांच्या प्रभावी अभिनयासोबत वास्तववादी कथानक, ताकदीचे संवाद आणि भावनिक गहिरेपणा हे लघुपटाचे मुख्य आकर्षण आहे. वास्तववादी चित्रण आणि निर्मितीची देखणी मांडणी यामुळे हा लघुपट प्रेक्षकांच्या मनाला भिडेल, असा निर्मात्यांचा विश्वास आहे.

हेही वाचा : व्यक्तीविशेष: डॉ. बाळासाहेब वाफरे यांना ‘नोबेल रिसर्च अवॉर्ड’

तांत्रिक माहिती:

निर्माता: कल्याणी कुंभार

कार्यकारी निर्माता: श्रीपाद दीक्षित

छायाचित्रण: अनिकेत आगम

संकलन: सारंग पंचाक्षरी

लेखन-दिग्दर्शन: हर्षल आल्पे

कलाकार: अभिषेक वीरकर, धनश्री कुलकर्णी

जीवनातील उत्तरांच्या शोधात असलेल्या प्रत्येकासाठी ‘उत्तर’ हा लघुपट नवा विचार आणि प्रेरणा देणारा ठरेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button