Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे
पुण्यात गडगडाटासह जोरदार पाऊसाची हजेरी
पुणे |
शहर व ग्रामीण भागात सलग तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने आजही दुपारी साडेतीन नंतर गडगडाटी हजेरी लावली. पुढील दोन तास गडचिरोली, नांदेड, सोलापूर, ठाणे जिल्ह्यांमध्ये विजा, वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याचे हवामान शास्त्र विभागाने म्हटले आहे. पुणे जिल्ह्यात घाट क्षेत्र आणि लगतच्या परिसरात मुसळधार पाऊस अपेक्षित असून त्याची सुरुवात झाली आहे.





