ताज्या घडामोडीपुणे

केस बांधून झोपण्याचे फायदे आणि तोटे

केसांची देखभाल न केल्यास ते गळतात, तटतात आणि कमजोर होतात

पुणे : केसांची निगा राखणे हे प्रत्येकासाठी आव्हान बनले आहे, धावपळीच्या जगात केसांची काळजी घेण्यास वेळ मिळत नाही केस लवकर गळू लागतात किंवा पांढरे होण्यास सुरुवात होतात. त्यातच, अनेकांना प्रश्न पडतो की झोपताना केस मोकळे ठेवावेत की नाही ? योग्य पद्धतीने केसांची देखभाल न केल्यास ते गळतात, तटतात आणि कमजोर होतात,अनेक मोठ्या समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे या स्टोरीत आपण जाणून घेऊया की रात्री केस कसे ठेवावेत.

केस मोकळे ठेवून झोपणे फायदेशीर की हानिकारक?
कोणी म्हणत केस मोकळे सोडून झोपावे तर कोणी म्हणत बांधून झोपावे. केस मोकळे ठेवून झोपण्याचे काही फायदे आहेत तर काही तोटेही आहेत. जर तुमचे केस रफ, लांब आणि जाड असतील, तर ते रात्री झोपताना अधिक गुंततील आणि तुटण्याची शक्यता वाढेल. तसेच केस उशाशी घासले गेल्याने त्यातील फ्रिझ वाढेल आणि केस निस्तेज होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो असे केस असतील तर ते बांधूनच झोपणे योग्य. मात्र, लहान आणि पातळ केस असतील, तर त्यांच्यावर बांधन न बांधन्याचा फारसा परिणाम होत नाही.

रात्री डोकं शांत असल्याने जर केस मोकळे ठेवले तर रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना योग्य पोषण मिळते, ज्यामुळे ते अधिक मजबूत होतात. परंतु, जर केस फारच गुंतत असतील, तर मोकळे ठेवण्याचा विचार पुन्हा एकदा करायला हवा.

रात्री झोपण्यापूर्वी या गोष्टी करणे टाळा
१. केस घट्ट बांधून झोपणे- केस घट्ट बांधून झोपल्याने ते लवकर कमजोर होऊन गळू लागतात.

२. ओले केस घेऊन झोपणे- ओले केस ठेवून झोपल्याने केसात चिप-चिप वाढते व कोंड्याचे त्रास होतात

३. अस्वच्छ ऊशी घेऊन झोपणे- अस्वच्छ ऊशीवर झोपल्याने उशीतील जर्म्स आणि बॅक्टेरिया केसांना खराब करू शकतात

४. केसांना कोणतेही प्रोडक्ट्स लावून झोपणे टाळा- रात्री झोपण्यापूर्वी केसाला कोणतेही प्रोड्क्ट्स लावणे टाळा अन्यथा केस लवकर डॅमेज होऊ शकतात

हेही वाचा  :  ‘जयकुमार गोरेंसारखे विकृत मंत्री राज्यमंत्रिमंडळात’; संजय राऊतांचा हल्लाबोल 

रात्री केस बांधणे किंवा मोकळे ठेवण्याचा योग्य मार्ग
१. जर तुम्हाला केस मोकळे ठेवून झोपायचे असतील, तर कॉटनऐवजी सिल्कच्या उशीचा वापर करा. सिल्कच्या उशीमुळे केस कमी घासले जातात आणि फ्रिझ कमी होतो.

२. झोपण्यापूर्वी केस सौम्य ब्रशने मोकळे करून झोपल्यास ते फारसे गुंतत नाहीत.

केस बांधून झोपायचे असल्यास
१. केस बांधताना टाइट रबर बँड अथवा क्लिपचा वापर करू नका. यामुळे टाळूला ताण बसतो व केस लवकर कमजोर होतात.

२. चांगला पर्याय म्हणजे मऊ स्क्रंची वापरणे किंवा केस मोठी असल्यास सैल वेणी घालणे. यामुळे केस मोडण्याची शक्यता कमी होते.

३. केसांना थोडेसे तेल लावून हलक्या हाताने केस बांधून झोपा

केस मोकळे ठेवायचे की बांधायचे, याचा निर्णय तुमच्या केसांच्या जाडसरपणा किंवा लांबी यावर अवलंबून असतो. जर केस पातळ आणि लांब असतील, तर हलकी वेणी घालून झोपणे योग्य ठरेल, तर लहान केसांसाठी मोकळे ठेवणे त्रासदायक ठरणार नाही. योग्य पद्धतीने केसांची काळजी घेतल्यास ते निरोगी आणि सुंदर राहतील.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button