TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

गणेशोत्सवात मोबाईल चोरणारी कर्नाटकातील टोळी गजाआड ; ८४ मोबाईल संच जप्त

पुणे  | गणेशोत्सवातील गर्दीत मोबाईल चोरी करण्यासाठी आलेल्या कर्नाटकातील चोरट्यांच्या टोळीला सिंहगड पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून १५ लाख २५ हजार रुपयांचे ८४ मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत. चोरट्यांच्या टोळीने शहरातील गर्दीच्या ठिकाणी नागरिकांकडील मोबाईल संच लांबविल्याचे तपासात उघड झाले आहे.

शरथ मंजूनाथ (वय २१), केशवा लिंगराजू (वय २४), नवीन हनुमानथाप्पा (वय १९, तिघे रा. भद्रावती, शिमोगा, कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्यंची नावे आहेत. गणेशोत्सवात राज्याच्या वेगवेगळ्या भागातून भाविक दर्शनासाठी येतात. उत्सवाच्या कालावधीत मोबाईल चोरी करण्यासाठी शरथ, केशवा, नवीन शहरात आले होते. गेल्या दहा दिवसांपासून त्यांनी मार्केट यार्ड, बालाजीनगर, स्वारगेट पीएमपी स्थानक, सिंहगड रस्त्यावरील अभिरुची परिसर, वडगाव भाजी मंडई परिसरासह गर्दीच्या ठिकाणांवरुन नागरिकांकडील मोबाईल संच लांबविले होते. सिंहगड रस्त्यावरील फन टाईम चित्रपटगृहाजवळ मोबाइल चोरट्यांची टोळी थांबल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी देवा चव्हाण, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button