Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडगावात ‘शिवगान’ स्पर्धेचे आयोजन

– भाजपा सांस्कृतिक आघाडीचे आयोजन

पिंपरी । प्रतिनिधी

शिवजयंती व भरतमुनी जयंती निमित्त व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ‘शिवगान’ स्पर्धेचे चिंचवडगावात मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले. भाजपाचे जेष्ठ नेते मधू जोशी व नगरसेविका उषा मुंढे याच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड विधानसभेत सांस्कृतिक व क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रभाग स्तरावर आयोजन केले जात आहे. भाजपा सांस्कृतिक आघाडी व नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने ‘शिवगान’ स्पर्धेचे आयोजन चिंचवड येथिल मोरया गोसावी समाधी मंदीर प्रांगणात करण्यात आले आहे.

याप्रसंगी मधू जोशी, उषा मुंढे व नरेंद्र आमले यांची उद्धाटनपर भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ॲड.नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांनी केले तर धनंजय शाळिग्राम यांनी आभार मानले.

या वेळी आयोजक नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे, नगरसेवक सागर आंघोळकर, सांस्कृतिक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे संयोजक नरेंद्र आमले, सांस्कृतिक आघाडीचे शहराध्यक्ष धनंजय शाळिग्राम, ब’ प्रभाग स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, चिंचवड किवळे मंडलाध्यक्ष योगेश चिंचवडे, प्राधिकरण चिंचवड मंडलाध्यक्ष विजय शिनकर, युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य अजित कुलथे, सांस्कृतिक आघाडी शहर सरचिटणीस निषाध शिधये, चेतन हिंगे, उपाध्यक्ष मदन जोशी, वैभव साठे, वैष्णवी गर्गे, ओबीसी आघाडीचे शहर उपाध्यक्ष योगेश मोरे, महेश जोशी, प्रभाग महिला अध्यक्षा पूजा सराफ आदी प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी व स्पर्धा परीक्षक उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button