उन्हाळ्यात ‘या’ पीठांपासून बनवलेल्या पोळ्या शरीरासाठी सर्वोत्तम
उन्हाळ्यात स्वतःला हेल्दी आणि तंदुरुस्त ठेवायचे असेल, तर गव्हाच्या पीठाऐवजी...

पुणे : उन्हाळ्यात आपल्याला अनेकदा असे पदार्थ खाण्याची इच्छा होते जे शरीराला थंडावा देतात. मात्र या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्यात वारंवार बाहेरचे किंवा जंक फूड खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकते. म्हणून, स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी घरात तयार केले अन्नपदार्थांचे सेवन करावे. त्यातच तुमच्या आहारात अशा काही पदार्थांचा समावेश करा जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
आपण पाहतोच की, सहसा प्रत्येक घरांमध्ये गव्हाच्या पोळ्या बनवल्या जातात. मात्र तुम्हाला उन्हाळ्यात स्वतःला हेल्दी आणि तंदुरुस्त ठेवायचे असेल, तर गव्हाच्या पीठाऐवजी इतर पिठापासून बनवलेल्या पोळ्यांचा तुमच्या आहारात समावेश करून पाहा. कारण ह्या पोळ्या फक्त खायला चविष्ट नाहीत तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. अशाच काही पीठांबद्दल आणि त्यांच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया. तसेच तुम्ही या पीठापासून तयार केलेल्या पोळ्या एकदा खाल्ल्या की गव्हाच्या पोळीचा तुम्हाला विसर पडेल.
हेही वाव्हा – उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी उपाययोजना करण्याचे पिंपरी महापालिकेचे नागरिकांना आवाहन
या पीठांपासून बनवलेल्या पोळ्या उन्हाळ्यात शरीरासाठी सर्वोत्तम
चन्याचे पीठ (बेसन): चन्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात, म्हणून चन्याच्या पीठांपासून बनवलेली भाकरी खाल्ल्याने शरीराला चांगल्या प्रमाणात प्रथिने मिळतात, व शरीराला शक्ती प्रदान करते. त्यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते. उन्हाळ्यात या भाकरीचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि पोटाची जळजळही कमी होते.
नाचणीचे पीठ : नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर असते, जे हाडांसाठी फायदेशीर असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नाचणी पासून बनवलेल्या भाकरीचे सेवन तुम्हाला खुप फायद्याचे ठरेल. कारण याने शरीराला थंडावा मिळतो आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. यामध्ये असलेले फायबर पचनक्रिया निरोगी ठेवते आणि साखर नियंत्रित करण्यास देखील मदत करते.
जवसाचे पीठ : उन्हाळ्यात तुम्ही गव्हाच्या पोळी ऐवजी जवसाच्या पीठापासून तयार केलेली भाकरीचे सेवन करावे. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते आणि जवसमध्ये थंडावा असल्याने उन्हाळ्यात ते फायदेशीर मानले जाते.
हरभरा, नाचणी आणि ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या भाकऱ्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच यांच्या सेवनाने तुमचे पोट तर भरतेच, शिवाय तुमचे आरोग्यही चांगले राहते मात्र तुम्हाला यापैकी कोणत्याही गोष्टीची ऍलर्जी असेल किंवा तुम्ही कोणत्याही आजारावर उपचार घेत असाल, तर कोणताही नवीन आहार घेताना सुरू करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.