रणवीरवर नाही, तर FWICE वर बंदी घाला; बड्या दिग्दर्शकाचे खळबळजनक वक्तव्य

Filmmaker Ram Gopal Varma : गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीमध्ये ‘डॉन ३’ या चित्रपटाबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. फरहान अख्तरच्या या चित्रपटातून अभिनेता रणवीर सिंहने अचानक बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर FWICE कडून जारी करण्यात आलेला असहकार्याच्या आदेशाने या वादाला अधिकच उधाण आले आहे. या आदेशात रणवीर सिंहवर बंदी घातलण्यात आली. त्यानंतर आता एका प्रसिद्ध निर्मात्याने रणवीर सिंहला पाठींबा दिला आहे. त्याने थेट ‘रणवीर सिंहवर नाही, तर FWICE वर बंदी घाला’ अशी मागणी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणात चित्रपट निर्माते राम गोपाल वर्माने उघडपणे रणवीर सिंहला पाठींबा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहित FWICE च्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत आणि म्हटले आहे की कोणत्याही खाजगी वादात अशा प्रकारचा हस्तक्षेप योग्य नाही. वर्मा यांच्या या वक्तव्यानंतर चित्रपटसृष्टीत या मुद्द्यावरील चर्चा अधिकच तीव्र झाली आहे.
राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये FWICE वर टीका करताना म्हटले आहे की, हे पाऊल उद्योग किंवा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी नसून ताकद दाखवण्याचा प्रयत्न असल्यासारखे वाटते. त्यांचे म्हणणे आहे की एखाद्या कलाकाराविरुद्ध असहकाराचा निर्णय शेवटी स्वतः संघटनेसाठीच एक विनोद ठरू शकतो. त्यांनी FWICE ला एक जुनी व्यवस्था म्हणत असे स्पष्ट केले की ही संस्था केवळ आपली पकड टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
हेही वाचा – पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावासाचा इशारा
वर्मा म्हणाले की ‘डॉन ३’ चा वाद हा मूळतः निर्माता आणि अभिनेता यांच्यातील कराराशी संबंधित मुद्दा आहे. त्यांच्या मते, अशा प्रकरणांचा निर्णय संबंधित पक्षांनी किंवा न्यायालयाने घ्यायला हवा. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की जेव्हा देशभरात दररोज असे अनेक व्यावसायिक वाद होतात, तेव्हा याच प्रकरणात FWICE ची भूमिका का दाखवली जात आहे? राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये असा दावा केला आहे की चित्रपटसृष्टी रणवीर सिंहसारख्या स्टार्समुळे चालते. ते म्हणाले की, जर रणवीरने एखाद्या नवीन प्रोजेक्टसाठी होकार दिला, तर अनेक निर्माते त्याच्यासोबत काम करण्यासाठी तयार होतील. वर्मा यांचे असे मानणे आहे की स्टार्स रोजगार निर्माण करतात आणि इंडस्ट्रीच्या आर्थिक घडामोडींना चालना देतात.
खरं तर, फरहान अख्तरच्या ‘डॉन ३’ मध्ये रणवीर सिंगला मुख्य भूमिकेत घेण्यात आले होते. नंतर तो या चित्रपटातून बाहेर पडल्याच्या बातम्या समोर आल्या. रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी दावा केला की या निर्णयामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यानंतर हे प्रकरण FWICE पर्यंत पोहोचले आणि संघटनेने रणवीरविरुद्ध असहकाराचा आदेश जारी केला. मात्र, रणवीर सिंगच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की तो चित्रपटसृष्टीचा (फिल्म फ्रॅटर्निटीचा) सन्मान करतो आणि अशी प्रकरणे प्रतिष्ठेने आणि परस्पर सन्मानाने सोडवली पाहिजेत.





