Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पुणे-लोणावळा दरम्यान पाचवी विशेष लोकल सुरु

पुणे – पुणे-लोणावळा दरम्यान अनलॉकच्या कालावधीत चार विशेष लोकल चालवल्या जात होत्या. त्यात वाढ करत आणखी एक लोकल सुरु करण्यात आली आहे. पुणे-लोणावळादरम्यान पाच आणि लोणावळा-पुणे दरम्यान पाच लोकल गाड्या दररोज सुटणार आहेत. पाचवी लोकल गाडी बुधवार (दि. 1 सप्टेंबर) पासून सुरु होणार आहे.

पाचवी विशेष लोकल (01493) लोणावळा येथून सकाळी साडेसहा वाजता सुटेल. सकाळी 7.55 वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल. वापसीमध्ये पुणे स्थानकावरून (01494) रात्री आठ वाजता सुटेल. रात्री साडेनऊ वाजता लोणावळा स्थानकावर पोहोचेल.

1 सप्टेंबर पासून लोकलचे वेळापत्रक –

पुणे – लोणावळा

# लोकल क्रमांक (01486) पुणे स्थानकावरून 06.30 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 07.50 वाजता पोहोचेल.

# लोकल क्रमांक (01482) पुणे स्थानकावरून 08.05 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 09.25 वाजता पोहोचेल.

# लोकल क्रमांक (01488) पुणे स्थानकावरून 16.25 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 17.45 वाजता पोहोचेल.

# लोकल क्रमांक (01484) पुणे स्थानकावरून 18.02 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 19.27 वाजता पोहोचेल.

# लोकल क्रमांक (01494) पुणे स्थानकावरून 20.00 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 21.30 वाजता पोहोचेल.

लोणावळा – पुणे

# लोकल क्रमांक (01493) लोणावळा स्थानकावरून 06.30 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 07.55 वाजता पोहोचेल.

# लोकल क्रमांक (01481) लोणावळा स्थानकावरून 08.20 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 09.45 वाजता पोहोचेल.

# लोकल क्रमांक (01485) लोणावळा स्थानकावरून 10.05 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 11.25 वाजता पोहोचेल.

# लोकल क्रमांक (01483) लोणावळा स्थानकावरून 18.20 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 19.45 वाजता पोहोचेल.

# लोकल क्रमांक (01487) लोणावळा स्थानकावरून 19.35 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 20.55 वाजता पोहोचेल.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button