Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

चार महिन्यात ९५ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू, सर्वाधिक तरुण पोलिसांनी गमावले जीव

 

मुंबई – कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झाल्याने राज्यात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. लॉकडाऊनवर करडी नजर ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी कंबर कसली आहे. मात्र, असं असतानाच त्यांच्यावर कोरोनाने घाला घातला आहे. गेल्या चार महिन्यांत राज्यात तब्बल ९५ पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, गेल्यावर्षीपासून आतापर्यंत 427 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक पोलिसांना कोरोनाचा संसर्ग होत होता. पोलिसांसाठी तत्काळ मदतही होत होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्याप्रमाणे इतर सर्वसामान्य होरपळले आहेत त्याचप्रमाणे फ्रंट लाईनवरून लढणाऱ्या पोलिसांनाही दुसऱ्या लाटेविरोधात सामना करावा लागत आहे. भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मार्च 2020 पासून सुरु झाला. तेव्हापासून आतापर्यंत तब्बल 427 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात 2020 मध्ये 332 पोलिसांचा कोरोनामुळे जीव गेला. तर गेल्या 4 महिन्यात 95 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

2021 च्या सुरुवातीला कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं प्रमाण कमी होतं. पण एप्रिल महिन्यात तब्बल 64 पोलिसांचा कोरोनामुळे जीव गेलाय. तर मे महिन्याच्या सुरुवातीच्या 2 दिवसांत 5 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये तरुण पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त असल्यामुळे पोलीस दलासमोर नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

2021 मध्ये जानेवारी ते मार्च महिन्यात पोलिसांच्या मृत्यूचं प्रमाण नियंत्रणात होतं. मात्र, एप्रिल महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली. या दुसऱ्या लाटेत 64 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर मे महिन्याच्या 2 दिवसात 5 पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलीस दलाच मोठं नुकसान होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

2021 मध्ये पोलिसांच्या मृत्यूचं प्रमाण

जानेवारी – 12 पोलिसांचा मृत्यू
फेब्रुवारी – 2 पोलिसांचा मृत्यू
मार्च – 12 पोलिसांचा मृत्यू
एप्रिल – 64 पोलिसांचा मृत्यू
मे – 5 पोलिसांचा मृत्य (2 दिवसात)

एप्रिल महिन्यात कोरोनामृतांची संख्या 25 टक्क्यांनी वाढली

महाराष्ट्रात गेल्या एप्रिल महिन्यात कोरोना मृतांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. गेल्या एकट्या एप्रिल महिन्यात कोरोना मृतांच्या संख्येत 25 टक्के वाढ झाली. तर नव्याने बाधित होणाऱ्यांची संख्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात 2 लाख 80 हजार इतकी झाली आहे. त्यामुळे राज्याती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने एप्रिल महिन्यात उच्चांक गाठला असून बाधितांची संख्या 57 टक्क्यांनी वाढली आहे. एकीकडे बाधितांच्या प्रमाणात मृत्यूदरात घट झाली असली तरी मृतांच्या संख्येत मात्र या महिन्यात 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

यात राज्यात सध्या सर्वाधिक मृत्यूदर सोलापूरचा असून जवळपास 4 टक्के इतका आहे. तर सिंधुदुर्ग, परभणी, नंदुरबार, अहमदनगर येथे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्याखालोखाल भिवंडी नगरपालिका(3.77 टक्के), सांगली(2.86 टक्के), कोल्हापूर(2.83 टक्के ), सिंधुदुर्ग (2.62 टक्के), मालेगाव(2.28 टक्के), उस्मानाबाद (2.30 टक्के), रत्नागिरी(2.15 टक्के), नांदेड (2.27 टक्के), सातारा(2.19 टक्के) आणि मुंबई(2.02 टक्के) यांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button