सहकारी संस्थांची निवडणूक; मतदार यादी तयारीच्या सूचना
पुणे : विधानसभा निवडणुकीमुळे स्थगित असलेल्या राज्यातील २९ हजार ४२९ सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. संबंधित सहकारी संस्थांना मतदार याद्या तयार करण्याच्या सूचना प्राधिकरणाने दिल्या असून दि. ३१ डिसेंबरपर्यंत मतदार याद्या आलेल्या संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली आहे. त्यामुळे राज्यातील अ वर्गातील ४२, ब वर्गातील १,७१६, क वर्गातील १२,२५० आणि ड वर्गातील १५,४३५ अशा एकूण २९ हजार ४४३ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात ७,१०९ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
हेही वाचा – महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर; कोण होणार मंत्री?
त्यानुसार २५० किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच ज्या प्रकरणी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने सहकारी सस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत सूचना केल्या आहेत, अशा संस्थांची निवडणूक प्रक्रिया पार पडली असून केवळ अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची नेमणूक करण्याचे आदेश दिले होते. अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड केली आहे किंंवा नाही, याबाबत संबंधित संस्थांकडून माहिती मागविण्यात येणार आहे.