Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘प्रकल्पांची कामे वेळेत करा’; उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : ‘‘विलंबामुळे प्रकल्पांच्या किमतीत मोठी वाढ होऊन राज्याचे दीर्घकालीन नुकसान होते. ते टाळण्यासाठी नियोजित वेळेत विकास प्रकल्प मार्गी लावा,’’ अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना दिली. पुण्यात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) उभारणीसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे पाठपुरावा करू, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

प्रकल्प संनियंत्रण कक्षाची (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट) बैठक उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झाली. त्यावेळी त्यांनी सूचना दिली. बैठकीला नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, ‘एमएसआरडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, ‘महारेल’चे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित होते.

हेही वाचा – शिवसृष्टीच्या दुसर्‍या टप्प्याचे शिवजयंतीला लोकार्पण; मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘‘पुणे शहर आणि उपनगरांची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रिंगरोडचे काम वेगाने मार्गी लावा. पुणे शहरात दरवर्षी लाखो नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत, त्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे.

उपनगरांतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी मेट्रो, उड्डाणपूल, रिंगरोड तसेच सुरू असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढवावा. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कर्जत-भीमाशंकर-खेड-शिरूर रस्त्याच्या कामाची व्यवहार्यता तपासून पहावी.’’

लोणावळ्यातील नियोजित स्कायवॉक, टायगर पॉइंट, पुणे-नाशिक ग्रीनफिल्ड सेमी हायस्पीड रेल्वे, सारथी संस्थेच्या नाशिक, कोल्हापूर, नागपूर, खारघर, छत्रपती संभाजीनगर, अमरावतीच्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, वीर वस्ताद लहूजी साळवे स्मारक, कृषिभवन, कामगार कल्याण भवन, सहकार भवन आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button