ताज्या घडामोडीपुणे

अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळासह पावसाची शक्यता

सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

पुणे : मोठी बातमी समोर येत आहे, गेल्या चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक भागांमध्ये जोरदार पावसासह गारपिटीचा तडाखा बसला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. फळबागा भुईसपाट झाल्या आहेत. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आहे. दरम्यान आजा पुन्हा एकदा हवामान विभागाकडून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहनही नागरिकांना करण्यात आलं आहे.

काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळासह पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा –  ‘जीआयएसद्वारे सर्व्हे करून दर तयार करा’; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

दरम्यान दुसरीकडे कल्याण-डोंबिवलीमध्ये वादळी वाऱ्याचा चांगलाच तडाखा बसला आहे, त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी फलक कोसळण्याच्या घटना घडल्या. याचा वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झाला. वादळामुळे काही भागांमध्ये वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.

कल्याणमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे खरेदीसाठी बाहेर निघालेल्या तसेच घरी परतणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान दुसरीकडे या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. अंबरनाथला देखील अवकाळी पावसानं झोडपून काढलं आहे. शहरात सर्वत्र सोसाट्याचा वारा अन धुळीचं वादळ आलं आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून, जोरदार पावसाची शक्यता आहे, आज कोकणासह मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button