Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

बांधकाम परवानगी अधिकाराचे विकेंद्रीकरण

पुणे : प्रशासकीय कामकाजात गतिमानता यावी, या उद्देशाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) बांधकाम परवानगी विभागातील कामकाजाचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे.

यात अतिरिक्त महानगर आयुक्त यांच्याकडे एक एकरापर्यंतचे भूखंड क्षेत्रावरील बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार असणार आहे. प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी बुधवारी हा निर्णय घेतला असून त्यांची तातडीने अंमलबजावणीचे आदेश द‍िले आहे.

हेही वाचा     –        ‘राहुल गांधींमुळे मला दुखापत’, भाजपा खासदाराचा आरोप; राहुल गांधी म्हणाले..

पीएमआरडीएमधील विकास परवानगी विभागात जे काही प्रस्ताव महानगर आयुक्त यांच्याकडे निर्णयासाठी सादर होत होते, त्यापैकी काही अधिकार त्यांनी अतिरिक्त महानगर आयुक्त यांच्याकडे हस्तांतरित केले आहे.

कामकाजात गतिमानता येण्याच्या दृष्टिकोनातून संबंध‍ित निर्णय घेण्यात आला असून प्रस्ताव सहाय्यक महानगर नियोजनकार, रचना सहाय्यक यांनी सह, उप महानगर नियोजनकार यांच्यामार्फत अतिरिक्त महानगर आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव दाखल करावे लागणार आहे.

आयुक्त डॉ. म्हसे यांनी अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक स‍िंगला यांच्याकडे या कामकाजाची जबाबदारी सोपवली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button