Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारण

‘राहुल गांधींमुळे मला दुखापत’, भाजपा खासदाराचा आरोप; राहुल गांधी म्हणाले..

नवी दिल्ली | संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वातावरण तापलं आहे कारण गुरुवारी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर भाजपाचे खासदार प्रताप चंद्र सारंगी यांना धक्का देऊन पाडल्याचा आरोप झाला आहे. मला राहुल गांधींनी धक्का दिला त्यामुळे मला जखम झाली आणि डोक्याला मार लागला असं प्रताप चंद्र सारंगी यांनी म्हटलं आहे.

खासदार प्रताप चंद्र सारंगी म्हणाले की, मी संसद भवनाच्या पायऱ्यांवर उभा असताना मागून आलेल्या राहुल गांधी यांनी एका खासदाराला ढकलले आणि तो खासदार माझ्या अंगावर पडल्याने मी सुद्धा पडलो. सारंगी यांना आता रुग्णालयात नेण्यात आलं आहे. तसंच या प्रकरणाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात आली आहे.

हेही वाचा     –      ‘पंकजा मुंडेंनी भाजपचे काम केले नाही’; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप

दरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याबाबत स्पष्टीकर दिलं आहे. ते म्हणाले, आम्ही मकर द्वाराने संसदेच्या आत चाललो होतो. त्यावेळी भाजपाचे काही खासदार उभे होते. त्यांनी आम्हाला आत जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला. त्यात धक्काबुक्की झाली. हे लोक संविधानावर आक्रमण करत आहेत, तसंच बाबासाहेब आंबेडकरांचा अपमानही भाजपाने केला आहे.

मी धक्काबुक्की केलेली नाही. आम्हाला भाजपाच्या खासदारांनी संसदेत जाण्यापासून अडवलं. आम्ही पायऱ्यांवर उभे होतो. जे काही घडलं आहे ते कॅमेरात कैद झालं आहे. मल्लिकार्जुन खरगेंना धक्काबुक्की करण्यात आली. धक्काबुक्की करुन काहीही साध्य होणार नाही. भाजपाचे खासदार हे आम्हाला संसदेत जाण्यापासून रोखू शकत नाहीत, असं राहुल गांधी म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button