Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शहरातील अभ्यासिकांचे सुरक्षा ऑडिट करा, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनची मागणी

पुणे : पुण्यातील एका अभ्यासिकेला आग लागल्याची घटना नुकतीच घडली. त्‍यानंतर स्‍पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची सुरक्षा एरणीवर आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शहरातील सर्व अभ्यासिका, वसतिगृहांचे तातडीने ऑडिट  करण्यात यावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनने केली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले तसेच पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे. पुणे शहर व पुणे महापालिका अंतर्गत शेकडो अभ्यासिका आहेत. या अभ्यासिकांमध्ये लाखो विद्यार्थी अभ्यासाला येत असतात.

हेही वाचा –  राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची पहिली यादी आज जाहीर होणार

अनेक अभ्यासिका मोडकळीस आलेल्या वाड्यामध्ये सुरु आहेत. अनेक अभ्यासिकांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही. जेवायला बसायला जागा नसते. कोंदट वातावरण आहे. फायर सेफ्टीची साधने बहुतांश अभ्यासिकेत नाहीत.

अचानक आग लागली तर मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे महापालिकेच्या अंतर्गत येणाºया सर्व अभ्यासिका तसेच. वसतिगृह यांची माहिती घेऊन त्यांचे आॅडिट करावे. धोकादायक इमारतीमध्ये चालू असलेल्या अभ्यासिकांवर कारवाई करावी. यापूर्वी देखील दोन वेळा निवेदन देण्यात आले होते.

मात्र, कोणत्या ही प्रकारची कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली नाही. भविष्यात जर दुर्दैवाने काही अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहिल, असा इशारा स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे महेश घरबुडे यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button