‘या’ लाडक्या बहिणींना सोडवा लागणार ‘लाभ’; शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुणेः युती सरकारची महत्वकांशी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना. सुरुवातीला या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणींला लाभ घेता आला. मात्र, सरकारच्या तिजोरीवर बोजा वाढल्याने शासनाने या योजनेच्या निकषांत अनेक बदल केले आहेत. तसेच ज्या लाडक्या बहिणींना इतर योजनाच्या माध्यमातून लाभ मिळत आहे, त्यांनी लाडकी बहिण योजनेचा मिळणार लाभ सोडावा, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले होते.
मात्र, यास तितकासा प्रतिसाद मिळाला नसल्याचे समोर आले होते. यातच आता राज्यातील लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणाऱ्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन केलेल्या पडताळणीची यादी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील ७५ हजार १०० लाभार्थी महिलांकडे किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे चारचाकी वाहन असल्याचे समोर आले आहे. या यादीनुसार आता जिल्हा परिषदेच्या अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन माहिती घेणार आहे.
शासनाला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळावा, यासाठी 21 लाख 11 हजार 991 एकूण अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जांपैकी 20 लाख 89 हजार 946 बहिणींनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर 75 हजार 100 बहिणींकडे त्यांच्या कुटुंबीयांकडे चारचाकी वाहने असल्याचे समोर आले आहे. यामध्ये वाहनधारकांच्या दोन याद्या आहेत. एका यादीत 58 हजार 350 दुसऱ्या यादीत 16 हजार 750 अशी एकूण 75 हजार 100 वाहनधारकांची यादी प्रशासनाला मिळाली आहे. त्यानुसार शासनाने जिल्हा परिषदेला पडताळणी करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पडताळणीचे काम कमी कालावधीत होऊन शासनाला अपात्र लाभार्थ्यांची यादी प्रशासनाकडून पाठवणार असल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजेनेचे ‘हे’ आहेत निकष
-लाभार्थी महिलेचे वय १८ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे.
-कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असावे.
-कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा तसेच प्राप्तिकर भरणारा नसावा.
-संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा.