पुणे पोलिस आयुक्तांचा फोटो वापरून पैसे उकळण्याचा प्रयत्न, अमितेश कुमारांनी बळी न पडण्याचं केलं आवाहन

पुणे : आजच्या सोशल मिडीया आणि इंटरनेटच्या दुनियेत रोज नवनव्या फसवणूकीच्या घटना समोर येताना दिसतात. अनेकदा सोशल मिडीया हॅक करून अनेकदा आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना मदत म्हणून पैशांची मागणी केली जाते अशा घटना सामान्य नागरिकांसोबत रोजच घडतात मात्र, अशीच घटना पुणे पोलिस आयुक्तांच्या बाबतीत देखील घडली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा फोटो आणि नावाचा गैरवापर करत पैशाची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा फोटो डीपीवर ठेवून लोकांकडून पैशाची मागणी होत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भातील आपल्या व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवून नागरिकांना माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या व्हॉट्सॲपला स्टेटसमध्ये माझ्या फोटोचा गैरवापर करून नागरिकाकडून पैशाची मागणी होत आहे तरी अशा पद्धतीची कुठली रिक्वेस्टला किंवा मेसेजला रिप्लाय करू नये अशी विनंती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली आहे.
हेही वाचा – शरद पवारांची भेट का घेतली? छगन भुजबळांनी भेटीचं कारण सांगितलं..
आपल्या नावाचा आणि फोटोचा वापर करून सोशल मिडीयवरून पैसे मागितले जात असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली आहे. त्यांनी आपल्या व्हॉट्सॲपला स्टेटसमध्ये अशा गोष्टींना बळी न पडण्याचं आवाहन देखील केलं आहे.





