Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मिशन विधानसभा : आमदार सुनील शेळके यांच्या विजयासाठी मावळ भाजपाची वज्रमूठ…!

मेरा बूथ सबसे मजबूत.. अभियान सक्षमपणे राबवणार

समर्पित भावनेतून महायुतीचे काम करण्याचा केला निर्धार

मावळ | मावळ विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या विजयासाठी भाजपाने वज्रमूठ बांधली असून, मेरा बूथ सबसे मजबूत… या मंत्रानुसार समर्पित भावनेतून शेळके यांच्यामागे ताकद उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आपण प्रवेश केला असून, प्रत्येक मतदान केंद्रावर बूथ सक्षमीकरणासाठी नियोजनबद्ध प्रयत्नांची आवश्यकता आहे. “मेरा बूथ सबसे मजबूत” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रानुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली, आपल्याला प्रत्येक मतदाराशी संपर्क साधायचा आहे. महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी आपल्या बूथवरून अधिकाधिक मतदान सुनिश्चित करण्यासाठी समर्पित भावनेने काम करुयात, अशा सूचना भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी केल्या आहेत.

हेही वाचा      –      पिंपरी-चिंचवडच्या ‘शाश्वत विकास’साठी एक मत मोलाचे!

दरम्यान, भारतीय जनता पार्टीतील दोन-तीन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवाराविरोधात भूमिका घेतली. याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनील शेळके यांच्या पाठिशी भाजपा पूर्ण ताकदीने राहील, अशी घोषणा केली होती. त्यामुळे मावळात महायुतीची ताकद वाढली आहे.

जनसंवाद दौरा, पदयात्रांमुळे वातावरण फिरलं..

दरम्यान, आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद दौरा आणि पदयात्रांसह सभा- बैठकांना मावळवासीयांनी प्रचंड प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, गेल्या ५ वर्षांतील विकासकामे आणि महिला सन्मानाच्या मुद्यावर सुनील शेळके यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली. किंबहुना, मतदार संघातील महिलावर्गाने ही निवडणूक हातात घेतली असून, ‘मावळात आण्णा पुन्हा…’ असे वातावरण निर्माण झाले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button