ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
नगरसेवक लांडगे यांचा भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा
पिंपरी | भोसरीतील भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांनी आज भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे लांडगे यांनी राजीनामा दिला.
भोसरी येथील धावडेवस्ती मधून रवी लांडगे 2017 साली बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपमधील जुन्या व निष्ठावंताच्या गटामध्ये त्यांचा समावेश होत होता. याबाबत बोलताना रवी लांडगे म्हणाले. नगरसेवक पदाच्या माध्यमातून सर्वांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने संघर्ष केला. यापुढेही करत राहणार आहे.
भारतीय जनता पार्टी हा पक्ष सत्ताधारी नव्हता अशावेळी निष्ठावान कार्यकर्त्यांनी कोणत्याही गोष्टींची तमा न बाळगता अत्यंत कठीण काळात पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले. पाच वर्ष सतत होणारा अन्याय सहन केल्यानंतर मी माझ्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.





