Pune | गणेशोत्सवात पुण्यात तीन दिवस दारूबंदी
पुणे | उद्या ७ सप्टेंबरला लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. घरोघरी बाप्पांच्या स्वागतासाठी भक्ताची तसेच सार्वजनिक मंडळांची तयारी पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर पोलीस व जिल्हा प्रशासनाकडूनही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यातील गणेशोत्सवातील नियोजन आणि त्यासाठीचे नियम याबद्दल पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पुण्यातील काही भागातील दारुची दुकाने गणेशोत्सव काळात बंद राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यातील फरासखाना, विश्रामबाग आणि खडक या तीन विभागातील दारुची सर्व दुकाने संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात बंद ठेवण्यात येणार आहे. तर ७ सप्टेंबर, १७ सप्टेंबर आणि १८ सप्टेंबर या तीन दिवसांत पुणे शहरातील सर्व दारुची दुकाने बंद ठेवण्यात येतील. त्याचबरोबर मद्यपींसाठी देखील महत्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात तीन दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे.
हेही वाचा – धक्कादायक! डब्यात नॉनव्हेज आणल्यामळे विद्यार्थाला शाळेतून काढून टाकलं
तसेच शहरातील संबंधित भागातील दारू विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दारू विक्री दुकानांवर पोलिसांचा वॉच असणार आहे.