breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘मी कधीही थांबणार नाही, मी कोणासमोर कधी झुकणार नाही…’; पंकजा मुंडे यांचे आवाहन

पुणे : ‘मी कधीही थांबणार नाही, मी कोणासमोर कधी झुकणार नाही. काम करत राहील. तुम्ही असेच प्रेम करत रहा’. असे आवाहन भाजपच्या माजी मंत्री व आमदार पंकजा मुंडे यांनी वाघोली येथे केले. भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा प्रवास योजनेअंतर्गत शिरूर हवेली विधानसभा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पंकज मुंडे यांनी मार्गदर्शन केले.

तसेच भाजप युवा मोर्चाचे वाघोलीतील जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन मुंडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या. मुंडे यांनी पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीसंदर्भात सूचना ऐकूण घेत मार्गदर्शन केले.

यावेळी भाजपचे याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, राहूल पाचर्णे, जयश्री पलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, गणेश कुटे, अनिल सातव पाटील, दत्तात्रय हरगुडे, विजय जाचक, आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा   –    एकट्या महाराष्ट्रात ५२.४६% परकीय गुंतवणूक; देवेंद्र फडणवीस यांची माहिती

यावेळी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी नागरिकांना आपल्यावर दाखवलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. वाघोलीत भाजपच्या विविध मंत्रिमंडळातील नेतेमंडळींना आणून दमदार कार्यक्रम करणाऱ्या संदीप सातव यांचे पंकजा मुंडे यांच्याकडून कौतुक करण्यात आले.

जनसेवा अविरतपणे चालू ठेवणे बाबतचा सल्ला देखील मुंडे यांनी सातव यांना दिला. पंकजा मुंडे जनसेवा कार्यालयाच्या उद्घाटनासाठी दाखल झाल्यानंतर त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी तसेच त्यांना भेटवस्तू, पुष्पगुच्छ देण्यासाठी नागरिकांनी त्यांच्याभोवती एकच गर्दी केली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button