breaking-newsताज्या घडामोडीदेश-विदेश

धक्कादायक! डब्यात नॉनव्हेज आणल्यामळे विद्यार्थाला शाळेतून काढून टाकलं

Viral Video | एका विद्यार्थ्याने शाळेत जेवणाच्या डब्यात नॉनव्हेज आणल्याने त्या विद्यार्थ्यांला थेट शाळेतून काढून टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एका खासगी शाळेत हा प्रकार घडला आहे. यानंतर मुलाची आई आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्यामध्ये जोरदार वादावादी देखील झाल्याचे दिसत आहे. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये शाळेचे मुख्याध्यापक आणि मुलाच्या आईमध्ये शा‍ब्दिक वाद सुरु असल्याचे दिसून येत आहे. तसेच शाळेचे मुख्याध्यापक मुलाच्या आईला सांगताना दिसत आहेत की, आम्ही अशा मुलांना शिकवू इच्छित नाहीत जे नॉनव्हेज शाळेत आणतील. तसेच तुमचा मुलगा प्रत्येकाला नॉनव्हेज देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना इस्लाम स्वीकारण्याविषयी बोलतो, असा आरोप मुख्याध्यापकांनी केल्याचं वृत्तात म्हटले आहे. मात्र, यावर विद्यार्थ्याने शाळेत नॉनव्हेज आणले नसल्याचे स्पष्टीकरण मुलाची आई देत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हेही वाचा   –    एकट्या महाराष्ट्रात ५२.४६% परकीय गुंतवणूक; देवेंद्र फडणवीस यांची माहिती

https://x.com/iamCharlie55555/status/1831893445851431201

दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापकांनी केलेल्या आरोपावर मुलाच्या आईने सांगितले की, ७ वर्षांचा मुलगा अशा गोष्टींबद्दल बोलू शकत नाही. ज्यावर मुख्याध्यापक म्हणाले की, मुलांना हे सर्व त्यांच्या पालकांनी शिकवलं आहे. तसेच इतर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तक्रारी येत असल्यामुळे विद्यार्थ्याचे नाव शाळेच्या रजिस्टरमधून काढून टाकण्यात आल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button