Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

अजित पवार बारामतीमधूनच लढणार

पुणे : राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचा बारामती हाच डीएनए आहे. त्‍यामुळे अजित पवार हे बारामती मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्‍याचे स्‍पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहेत.पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे ‘महाराष्ट्र व्हीजन २०५०’ या विशेष कार्यक्रमात सुनील तटकरे बोलत होते.

याप्रसंगी तटकरे यांनी पक्षाची सविस्‍तर भूमिका मांडली. सध्या राज्‍याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून लढण्यात फार रस नसल्‍याचे बोलून दाखवले. त्‍यासंदर्भात तटकरे म्‍हणाले, अजित पवार हे बारामती मतदारसंघातून लढणार आहेत.

हेही वाचा    –    लाडकी बहीण नव्हे, ‘मुख्यमंत्री’ लाडकी बहीण योजना म्हणा; शंभूराज देसाई यांचं विधान 

त्‍यांना बारामतीमध्येच रस आहे. अजित पवार म्‍हणजेच बारामती आणि बारामती हाच त्‍यांचा डीएनए आहे, असे सांगत तटकरे यांनी अजित पवारांच्‍या उमेदवारीबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला.त्‍याचप्रमाणे महायुतीत विधानसभा निवडणुकीत जागावाटपाची चर्चा होत असून, त्‍याबाबत बोलणी फार पुढे गेली आहेत. जागा वाटपाचा तपशील लवकरच जाहीर केला जाणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

पुढच्‍या २५ वर्षांत राज्‍यातील पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला गेला पाहिजे. त्‍यासाठी काही प्रमाणात निधी उभारावा लागेल. सध्या महाराष्ट्रावर मोठे कर्ज आहे, अशी टीका होते. मात्र, राज्‍यातील उत्‍पन्नाचा विचार करता आणि निती आयोगाच्‍या नियमानुसार हे प्रमाण कमी आहे.

त्‍यामुळे यावरून होणारी टीका निरर्थक आहे, तसेच येत्‍या दहा- पंधरा वर्षांत प्रादेशिक पक्षांचा विचार करता आघाडीशिवाय सरकार स्‍थापन होणार नाही, असेही तटकरे म्‍हणाले. या वेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे आणि सरचिटणीस मीनाक्षी गुरव उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button