आम आदमी पार्टीचे सर्व प्रभागांत उमेदवार

पुणे : आम आदमी पार्टीच्या वतीने पुणे व पिंपरी- चिंचवड महापालिका निवडणुकांत सर्व प्रभागांमध्ये सक्षम उमेदवार उभे करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
आम आदमी पार्टीच्या राज्य समिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील कार्यकर्त्यांची बैठक कोरेगाव पार्क येथील येथे आयोजित करण्यात आली होती.
हेही वाचा : मास्टर माईंड ग्लोबल कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
या बैठकीला राज्य समिती कार्यकारी अध्यक्ष अजित पाटील, उपाध्यक्ष विजय कुंभार, सचिव डॉ. अभिजीत मोरे, राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, पुणे शहराध्यक्ष धनंजय बेनकर, पुणे शहर प्रवक्ता किरण कद्रे, युवक अध्यक्ष अमित मस्के रविराज काळे आदी उपस्थित होते.
राज्यात होणाऱ्या सर्व महापालिका, नगरपालिका निवडणुका आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. त्या अनुषंगाने तयारी महापालिकेची हा कार्यक्रमही घेण्यात आला होता. आगामी महापालिका निवडणुका पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्याचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.