नराधम दत्तात्रय गाडे याचं आणखी एक धक्कादायक कृत्य समोर
अत्याचार झाला त्याच रात्री आरोपी दत्ता गाडे यानं एका महिलेची छेड काढली

पुणे : नराधम दत्तात्रय गाडे याचं आणखी एक धक्कादायक कृत्य समोर आल्याची माहिती मिळतेय. अत्याचार झाला त्याच रात्री आरोपी दत्ता गाडे यानं एका महिलेची छेड काढली होती, अशी माहिती समोर येत आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याच्यावर अनेक तक्रारी दाखल असून आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासह आरोपीने पीडितेचा गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे.
हेही वाचा: ‘विरोधी पक्षनेते पदावर आमचा हक्क’; संजय राऊत यांचं विधान
काय करायचे ते कर पण मला जिवंत ठेव, अशी याचना स्वारगेट अत्याचार घटनेतील पीडितेने आरोपी दत्तात्रय गाडे याच्याकडे केली. आरोपी दत्तात्रय गाडे याने दोन वेळा पीडितेवर अत्याचार केल्याचेही पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात एसटीच्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षाच्या तरुणीवर बलात्काराची घटना घडला. या घटनेनंतर सर्वच राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्वारगेट एसटी स्टँड पहाटे साडेपाच वाजले होते. तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट एसटी स्टँडमध्ये आली आणि बसची वाट पाहत बाकावर बसली. त्याच वेळी नराधम दत्तात्रय गाडे तरुणीकडे आला आणि ताई म्हणून कुठे जायचं आहे अशी विचारणा केली. मात्र ज्याने ताई म्हणून तरूणीला आवाज दिला त्याच नराधमाने पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत तरुणीवर अत्याचार केलेत.