Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पर्यावरणासाठी महापालिकेचे एक पाऊल पुढे

पुणे :  पर्यावरणास घातक असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी ) पासून बनविलेल्या मूर्तीवर न्यायालयाने बंदी घातली आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०२० मध्ये मूर्ती बनविणारे कारागीर आणि उत्पादकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहे.

मात्र, गेल्या चार वर्षांत गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी याबाबतचे आदेश काढले जात असल्याने तोपर्यंत वेळ निघून जाते. त्यामुळे महापालिकेने यंदा नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच शहरातील मूर्तिकारांची बैठक घेत या निर्णयाची माहिती दिली.

अद्याप मूर्ती तयार करण्याचे काम सुरू झालेले नसल्याने पीओपीला पर्याय म्हणून शाडू माती, कागद, तसेच इतर पर्यायांचा वापर करावा, अशा सूचना महापालिकेकडून या बैठकीत देण्यात आल्या आहेत. शहरातील २५ ते ३० मूर्तिकार या बैठकीस उपस्थित होते.

या वेळी त्यांच्याही अडचणी महापालिकेने ऐकून घेऊन त्या सोडविण्याचे आश्वासनही दिल्याचे पर्यावरण विभागाचे उपायुक्त संजय शिंदे यांनी सांगितले.

पर्यावरण संवर्धनासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करणारे मूर्तिकार, कारागीर, उत्पादक किंवा व्यावसायिकांकडून मूर्ती खरेदी करण्यासाठी नागरिकांनी प्राधान्य द्यावे. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महापालिकेकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा    –      पिंपरी चिंचवड शहरात भरणार ‘फार्मर स्ट्रीट’

या आहेत मार्गदर्शक सूचना

-केवळ जैवविघटनशील पर्यावरणास अनुकूल अशा शाडू माती, चिकणमाती वापरून बनवलेल्या कच्च्या मालापासून मूर्ती तयार करणे.

– अजैविक कच्चा माल, तसेच प्लास्टर ऑफ पॅरीस, प्लॅस्टिक आणि थर्माकोल (पॉलिस्टीरिन) चा वापर न करणे.

– मूर्तींचे दागिने बनविण्यासाठी फक्त वाळलेल्या फुलांपासून बनवलेले साहित्य, पेंढा इत्यादींचा वापर करावा आणि मूर्ती आकर्षक बनविण्यासाठी झाडांची नैसर्गिक उत्पादने चमकदार सामग्री म्हणून वापर करावा.

– मूर्ती रंगविण्यासाठी पर्यावरणास अनुकूल वॉटर कलर्स, जैवविघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक रंगाचा वापर करावा.

– विषारी आणि नॉनबायोडिग्रेडेबल (अविघटनशील) रासायनिक रंग, ऑइल पेंट्स, इनॅमल आणि कृत्रिम रंगावर आधारित पेंटस वापररू नयेत.

– नैसर्गिक साहित्य आणि रंग वापरून बनवलेले व काढता येण्याजोगे आणि धुण्यायोग्य सजावटीचे कपडे वापरावेत. फक्त वनस्पतींपासून तयार होणारे रंग (फुले, साल, पुंकेसर, पाने, मुळे, बिया, फळे) खनिज किंवा रंगीत खडक अशा नैसर्गिकरीत्या रंगांचा वापर करावा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button