सपना चौधरीच्या कार्यक्रमादरम्यान एकाचा चेंगरून मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/3sapna_choudhary.jpg)
पटना – हरियाणाची डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरी हिच्या गुरुवारी (ता. 15) रात्री झालेल्या कार्यक्रमादरम्यान एकाचा चेंगरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली.
बिहारमधील बेगूसराय येथे छट पुजेच्या कार्यक्रमादरम्यान सपना चौधरी हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. सपना चौधरी कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाली तेंव्हा तिला पाहण्यासाठी चेंगराचेंगरी झाली. आयोजकांनाही गर्दी आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. अखेर आयोजकांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू झाला. दरम्यान, चेंगराचेंगरीमध्ये अन्य नागरिकही जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.