Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘श्री व सौ पवार’ अर्थात कुंती अन्‌ रोहीत पवार यांना वाढदिनी नेटिझन्सकडून शुभेच्छांचा वर्षाव!

पुणे । प्रतिनिधी

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील विधानसभा सदस्य, आमदार रोहीत पवार यांचा आज वाढदिवस आहे. योगायोगाने त्यांच्या सौभाग्यवती कुंती यांचाही आजच वाढदिवस आहे. याबाबत स्वत: रोहीत यांनी सोशल मीडियावर आपल्या अर्धांगिनीला शुभेच्छा दिल्या आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रात रोहीत पवार यांचा फॅनफॉलोअर्स मोठा आहे. सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. पवार दांम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी नेटिझन्स सरसावले आहेत.

दरम्यान, आमदार रोहीत पवार यांनी अर्धांगिनी कुंती यांना शुभेच्छा देताना म्हटले आहे की, प्रत्येक कामात भक्कम साथ देणारी माझी अर्धांगिनी कुंतीचाही आज वाढदिवस आहे.सौ.च्या चेहऱ्यावरचा हा हास्याचा धबधबा असाच वाहत रहावा या शुभेच्छा, व मेणबत्ती न विझवता आपल्या संस्कृतीनुसार लावलेल्या या दिव्याप्रमाणे तिचं आयुष्य उजळत रहावं व उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावं ही प्रार्थना!

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button