Breaking-newsपुणे

शहरातील 150 कलाकारांचा होणार गौरव

  रविवारी चिंचवडमध्ये ‘कलासंगम सोहळा

पिंपरी – कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्त कलारंग कला संस्था व संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि.15) ‘कलासंगम सोहळा 2018’चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये पिंपरी-चिंचवड परिसरातील कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील 150 हून अधिक कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती कलासंस्था व संस्कार भारतीचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संकेत लोंढे, दिनेश मारणे, सुमित काटकर, अमित गोरखे, आशा नेगी, सुप्रिया धाईंजे, सरोज राव आदी उपस्थित होते.

चिंचवड, येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी सायंकाळी पाच वाजता हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी महापौर नितीन काळजे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, भाऊसाहेब भोईर, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर शैलजा मोरे उपस्थित असणार आहेत.

अमित गोरखे म्हणाले, ” शहरातील सांस्कृतिक, साहित्य आणि कला क्षेत्रातील सर्वांना, ज्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून शहराच्या नावलौकीकात भर घालण्याचा प्रयत्न केला आहे. अशा सर्वांचा सन्मान ‘कलासंगम 2018’ या कार्यक्रमात केला जाणार आहे. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्य, गायन, नृत्य, अभिनय, दिग्दर्शन, संगीत, चित्रकला, शिल्पकला, रांगोळी, निवेदन, छायाचित्रकार यासारख्या विविध क्षेत्रातील मंडळीचा सन्मान केला जाणार आहे.  यावेळी प्रभा एंटरप्रायझेस निर्मित पिंपरी-चिंचवड मधील स्थानिक कलाकारांचा मराठी व गाणी, नृत्याचा कार्यक्रम होणार आहे

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button