Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘मंत्री महोदयांचे निकटवर्तीय सुरक्षित नाहीत, तर सर्वसामान्य जनतेचे काय….’; सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

पुणेः कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या टोळीकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील एका व्यक्तीस बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली. गजा मारणेच्या टोळीकडून थेट केंद्रीय राज्यमंत्र्याच्या कार्यालयातीलच व्यकीला मारहाण करण्या इतपत आता मजल गेल्याने या घटनेवरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे शहरात गुडांनी उच्छाद मांडला असून या प्रकरणी मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने लक्ष घालून शहराची कायदा सुव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करावे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी त्यांच्या एक्सवर पोस्ट केली आहे. पुणे शहरात केंद्रीय मंत्री महोदयांचे निकटवर्तीय देखील सुरक्षित नाहीत. कुख्यात गुंडाने पुण्यातील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या स्टाफमधील काही कर्मचाऱ्यांवर हल्ला करून जखमी केले. केंद्रीय मंत्रीमहोदयांची ही अवस्था तर सर्वसामान्य जनतेचे काय हा प्रश्न आता उपस्थित झाला असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा –  बोपदेव घाट प्रकरणानंतर टेकड्यांची सुरक्षा ‘बळकट’, राज्य सरकारकडून ८० कोटींचा निधी मंजूर

तसेच गेली‌ काही दिवस पुण्यात गुंडांनी उच्छाद मांडला आहे.‌ भररस्त्यतात रिव्हॉल्व्हर काढणे, हाणामारी प्रकार नेहमीच घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी यात तातडीने लक्ष घालून शहराची कायदे सुव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे म्हटले आहे.

कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या टोळीकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील एका व्यक्तीस बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गजा मारणेच्या टोळीकडून थेट केंद्रीय राज्यमंत्र्याच्या कार्यालयातीलच व्यकीला मारहाण करण्यात इतपत आता मजल वाढल्याचे या घटनेवरून दिसत आहे. या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पुणे पोलीस करत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button