Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
विद्यार्थिनींना अश्लील क्लिप दाखवणारा शिक्षक गजाआड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/true-rapist.jpg)
सांगली – विद्यार्थिनीना अश्लील क्लिप दाखवून त्यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या तासगाव तालुक्यातील गोटेवाडी जिल्हा परिषद शाळेतील सहाय्यक शिक्षक उत्तम कांबळे (३५, मूळ गाव: विसापूर, ता. तासगाव) अखेर पोलीस ठाण्यात हजर झाला.
उत्तम कांबळे या शिक्षकाने काही विद्यार्थीनींना आपल्या मोबाईलवरुन अश्लील व्हिडीओ क्लिप दाखवून विद्यार्थीनींशी गैरवर्तन केले होते. याप्रकरणी त्याच्यावर पोक्सो अंतर्गत तासगाव पोलिसात गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर कांबळे हा फरार होता. पोलीस त्याच्या शोधात होते.
कांबळे याने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण तो अर्ज फेटाळण्यात आला होता. शनिवारी रात्री कांबळे हा तासगाव पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला.त्याला तासगाव न्यायालयात हजर केले असता ५ दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे.