Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
गोरेगावमध्ये इमारत कोसळून तिघांचा मृत्यू, 7 जखमी

मुंबई – गोरेगावमध्ये बांधकाम सुरु असलेल्या इमारत कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी आहेत. मोतीलाल नगरमध्ये म्हाडा वसाहतीत सकाळी ९ च्या सुमारास ही दुर्घटना घटना घडली आहे. तर इतर जखमींना उपचारासाठी सिध्दार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरु आहे. इमारतीखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.





