Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

“बसू द्या, आमच्या शेजारी; त्यांचं आमच्यावर प्रेम आहे.” अजित पवारांकडून चंद्रकांत पाटलांना टोमणा

पुणे |महाईन्यूज|

पुणे जिल्ह्याच्या शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी आज कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील एकमेकांच्या शेजारी बसल्याचेही पाहायला मिळालं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अजित पवार होते. तर या बैठकीला जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकारीही उपस्थिती होते. 

त्यावेळी काही वेळाने चंद्रकांत पाटील या ठिकाणी आले. आणि ते अजित पवारांच्या बाजूला जाऊन बसले. त्यावेळी अजित पवारांनीही “बसू द्या, आमच्या शेजारी, त्यांचं आमच्यावर प्रेम आहे.” असं गिरीश बापट यांच्याशी हातवारे करत म्हणाले.

यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, “माझे सर्वपक्षीय इतर अनेक नेत्यांशी प्रेमाचे संबंध आहेत. तसेच ते अजित पवार यांच्यासोबतही आहेत.” असे ते म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button