Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पुण्यातील हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी

पुणे |महाईन्यूज|
दहा लाख रुपयांची खंडणी दिली नाही तर, 500 ग्राम आरडीएक्स नोबल रुग्णालयात ठेवला जाईल”असा मेल आल्याने खळबळ उडाली. शनिवारी मध्यरात्री पर्यंत सायबर सेल व बॉम्ब शोधक पथकाने रुग्णालयाची तपासणी केली मात्र, कोठेही अरडीएक्स मिळून आले नाही.
खंडणी उकळण्यासाठी हा मेल केला असावा असा पोलिसांचा संशय आहे. पोलिस उपायुक्त सुहास बावचे हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांनी घटनास्थळी भेट दिली. ईमेल करणाऱ्या व्यक्तीचा शोध सायबर सेलच्या मदतीने सुरू आहे.दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.





