पुण्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईचे उदाहरण देत, आवश्यकता भासल्यास ‘जनता कर्फ्यू’ करण्याचे अजित पवारांचे आदेश

सध्या परिस्थितीत महाराष्ट्रात जर बघायला गेलं तर मुंबईपेक्षाही पुण्यात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.त्यातचं आता पुण्यात रुग्णांसाठी ऑक्सिजनचाही तुटवडा जाणवायला लागला आहे. पुण्यातील ‘ जम्बो कोविड सेंटर आणि ऑक्सिजनच्या तुटवड्या विषयी सतत तक्रारी येत आहेत. याच कारणावरून उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलच फैलावर घेतलं आहे.यापुढे तक्रारी आल्यास हयगय केली जाणार नाही अशा शब्दांत राज्याचे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले आहे. तसेच आवश्यकता भासल्यास जनता कर्फ्यू करा पण कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली पाहिजे असही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

जमाबंदी आयुक्त एस चोक्कलिंगम यांनी अन्य राज्यांमध्ये ‘जनता कर्फ्यू’ मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असल्याचे आज सकाळी घेतलेल्या आढावा बैठकीत अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर ‘आवश्यकता भासल्यास ‘जनता कर्फ्यू’ करा. मात्र हे करताना नागरिकांना त्रास आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी’..असं उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटलं आहे,..इकतच नाही तर, अजित पवार यांनी मुंबईचंही उदाहरण दिलं.
मुंबईत जर ‘बेड मॅनेजमेंट’ केंद्रीय पद्धतीने होत असेल तर, पुण्यात का नाही, असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी घेतलेल्या आढावा बैठकीत उपस्थित केला. जंबो रुग्णालयातील गोंधळामुळे संतापलेला पवार यांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना धारेवर धरत आपली जबाबदारी ढकलू नका, अन्यथा थेट कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिल्याने बैठकीत एकदम तणाव निर्माण झाला होता. पुण्यातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी व त्यांना खाटा मिळण्यासाठी ‘बेड मॅनेजमेंटची ‘ केंद्रीय पद्धतीने व्यवस्था निर्माण करा, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिल्या.
जम्बो रुग्णालयात गेल्या काही दिवसात झालेला गोंधळ, शहरातील वाढता प्रादुर्भाव, रुग्णांना उपचारांसाठी खाटा न मिळणे, यावरून पवार यांनी बैठकीत संताप व्यक्त केला. ‘तेच तेच प्रेझेंटेशन दाखवू नका, काय करायचे ते सांगा’, अशा स्पष्ट शब्दात पवार यांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना तंबी देत करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बैठकीमध्ये जम्बो रुग्णालयाच्या परिस्थितीचा आढावा घेताना येथील उपचारांसाठीची रुग्णसंख्या शक्य तितक्या लवकर वाढविण्याची गरज व्यक्त केली. त्याचबरोबर रुग्णांना खाटा मिळण्यासाठी केंद्रीय पद्धतीचा अवलंब होण्याची गरज आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल, अशी मागणी पवार यांच्याकडे केली. महापौर मोहोळ यांनी करोना संशयितांची आरटी-पीसीआर चाचणी होणे अपेक्षित आहे. त्यासाठी या चाचण्या वाढविण्याची मागणी केली. भविष्यकाळात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असून त्यासाठी तातडीने पावले उचलण्याची अपेक्षा ही मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केली.





