Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

“यापुढे तक्रारी आल्यास हयगय केली जाणार नाही”; अजित पवार प्रमुख अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले

सध्याच्या स्थितीत राज्यात कोरोनाचे सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. पुण्यातील स्थिती अजूनही नियंत्रणाबाहेरच आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रमुख अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे.

‘ जम्बो कोविड सेंटर आणि ऑक्सिजनच्या तुटवड्या विषयी सतत तक्रारी येत आहेत. आता खूप झाले, यापुढे तक्रारी आल्यास हयगय केली जाणार नाही’, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. विभागीय आयुक्त, पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी एकत्रपणे नियोजन करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आला. जम्बो सेंटर विषयी सतत तक्रारी येत आहेत; तसेच ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री पवार यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. त्याचप्रमाणे ‘ विभागीय आयुक्त, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी एकत्र येऊन नियोजन करावे आणि परिस्थिती नियंत्रणात आणावी’ असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button