Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

नराधम बापाचा पोटच्या नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

पुणे |महाईन्यूज|

अवघे नऊ वर्ष वय असलेल्या व दुपारच्या सुमारास एकटीच घरात खेळत असलेल्या आपल्याच पोटच्या मुलीवर पित्याने बलात्कार केल्याची लांच्छनास्पद व काळिमा फासणारी घटना नगर-कल्याण महामार्गावरील पिंपरी पेंढार (ता.जुन्नर जि.पुणे) येथे घडली. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडल्याची माहिती ओतूर पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली आहे.

घटनेची माहिती पीडित मुलीच्या आईला समजल्यावर आईने तत्काळ ओतूर पोलिस ठाणे गाठत झालेला प्रकार सांगितला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. या बाबतचा अधिक तपास ए. पी. आय. कांबळे करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button